Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: अंतिम शब्द साहेबांचाच! पवारांसोबतच्या भेटीनंतर वळसे पाटलांनी सांगितलं कशावर झाली चर्चा?

शरद पवारांसोबतच्या भेटीमुळे संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही, ही पुर्वनियोजित भेट होती अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवार यांना भेटण्यासाठी मोदीबाग येथे गेले होते. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे सध्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटात आहेत. सध्या ते सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणुन काम करत आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणुन दिलीप वळसे पाटील यांची राजकारणात ओळख आहे. दिवाळी निमीत्त शुभेच्छा देण्यासाठी ते पोहोचले. वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतला चर्चा केली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीमुळे संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही, ही पुर्वनियोजित भेट होती अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ही भेट पुर्वनियोजित होती. रयत शिक्षण संस्थेचे अनेक पदाधिकारी देखील होते. रयत शिक्षण संस्थेच्या निमीत्ताने भेट झाली आहे, या भेटीमागे वेगळं कारण नाही. असं दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं आहे.

या भेटीमुळे संभ्रम निर्माण होण्याचं काहीचं कारण नाही. मी अनेक संस्थांमध्ये काम करत आहे, त्या संस्थांच्या कामासाठी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत असतो. सहकारी संस्थांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून काही निर्णय घेण्यात आले आहेत ते शरद पवार यांच्या कानावर घातले आहेत, असंही दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं आहे.

संस्थामध्ये राजकारण नाही, शरद पवारांनी कधीच राजकारण आणलं नाही. राजकीय भूमिका हा वेगळा प्रश्न आहे, आणि संस्था या समाजाच्या आहेत. सर्वच संस्थांमध्ये सर्व पक्षांचे लोक आहेत. त्यामुळे इथे देखील वेगळं काही नाही असंही ते पुढे म्हणालेत. तर संस्थात्मक राजकारणात आंतिम शब्द कोणाचा या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना वळसे पाटील म्हणाले की, संस्थात्मक राजकारणात शरद पवार अनेक ठिकाणी अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचाच अंतिम शब्द आहे.

तर गावची ग्रामपंचायत हातातून गेली यावर प्रतिक्रिया देताना वळसे पाटील म्हणाले की, 'मी अजून गावाला गेलो नाही. २४ ग्रामपंचायत निवडणूका आमच्याकडे आहेत. ४ स्थानिक आणि २ शिंदे गटाला मिळाल्या आहेत. थोडा बदल मात्र झाला आहे. काही स्थानिक प्रश्नांमुळे बदल झाला असावा मी गावाला गेलो की ग्रामस्थांशी चर्चा करेन' असंही ते पुढे म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT