Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे-आंबेडकरांमध्ये खलबत

युतीचा निर्णय झाल्यानंतर ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात आज पहिली बैठक

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आज दुपारी बैठक पार पडणार आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडत आहे. तर आगामी काळात वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तर आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी वंचितकडून करण्यात आली आहे. तर आज वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांची पहिलीच बैठक पार पडणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली रणनीती ठरवण्यासाठी ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात आज दुपारी मुंबईत बैठकीत चर्चा होणार आहे.

त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याआधी महाविकास आघाडीमधील वंचित बाबत भूमिका आणि काही अटी शर्ती सांगितल्या होत्या. त्यासंदर्भात ठाकरे गट काय निर्णय घेणार हे या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. आंबेडकर आणि ठाकरे यांची युती होत असतानाच दुसरीकडे शिंदे गटही प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत आणण्याचे प्रयत्न करत आहे.

त्याचबरोबर आज हिवाळी अधिवेशनात मांडायच्या महत्वाच्या मुद्द्यांबाबत आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. 19 तारखेला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शेतकरी मोर्चाबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. तर या बैठकीला आंबेडकर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT