Sharad Pawar Resigns  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : निवृत्ती मागे घेतल्यानंतर शरद पवार रोखठोक बोलले! म्हणाले, "काँग्रेस सत्तेत येणार"

Sandip Kapde

Sharad Pawar : निवृत्ती मागे घेतल्यानंतर शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. विठ्ठल साखर कारखाण्यात त्यांनी हजेरी लावली. या कारखाण्यात बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कर्नाटक निवडणुकीवर भाष्य केले.

शरद पवार म्हणाले, कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत येणार आहे. फक्त ५ ते ७ राज्यात भाजपचे सरकार आहे. देशभरात भाजपची घसरण होत आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये आता भाजप नाही. तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये देखील भाजप नाही. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेमुळे सरकार आले. मध्यप्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री होते. तिथे देखील भाजपला आता संधी नाही.

तसेच शरद पवार यांनी बारसू रिफायनी प्रकल्पावर देखील भाष्य केले. पर्यावरणाला हाणी पोहचत असेत तर असे प्रकल्प नको. लोकांवर कोणतीही सक्ती नको त्यांना विश्वासात घ्यायला हवे, असे शरद पवार म्हणाले.

संजय राऊत राष्ट्रवादीत येणार असे नितेश राणे म्हणाले होते. यावर शरद पवार म्हणाले, कोणीतरी सिरीयस बोलत असेल तर मी उत्तर देतो. हे राणे-बिने यांच्यावर मी काय बोलाव, असे पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT