Chandrakant Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Anna Bhau Sathe Biography : उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची घोषणा हवेतच ! वर्षे उलटले तरी अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समितीला कार्यालय नाही

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कार्यालयाची तब्बल नऊ वर्षानंतरही उच्च शिक्षण विभागातील लालफितीच्या कारभारामुळे अपेक्षा सुरूच आहे.

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कार्यालयाची तब्बल नऊ वर्षानंतरही उच्च शिक्षण विभागातील लालफितीच्या कारभारामुळे अपेक्षा सुरूच आहे. यासाठी मागील वर्षी मार्च महिन्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन देऊनही आत्तापर्यंत समितीला हे कार्यालय मिळू शकले नसल्याने समितीचे सदस्य सचिव, सदस्याकडून अजूनही पुण्यात आल्यावर उपऱ्याप्रमाणे येऊन कारभार करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. नऊ वर्षे उलटली तरी  समितीला कार्यालय दिले जाण्याचे केवळ पोकळ आश्वासन दिले जात असल्याने याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीला मागील आठ वर्षात कार्यालय मिळू शकले नाही, याबाबत "सकाळ" ने बाजू समोर आणली होती. त्याच पार्श्वभूमीवर १२ मार्च २०२३ रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने समितीला कार्यालय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनानंतर पाटील यांचे राज्यभरात स्वागत झाले होते. मात्र आता त्याला एक दीड वर्षे पूर्ण होण्याच्या वाटेवर आला असताना समितीला कार्यालय मिळू शकले नसल्याची खंत समितीच्या सदस्यांकडून व्यक्त केली जात आहे.

इतक्या महत्त्वाच्या समितीला कार्यालय उपलब्ध करून देऊ नये, त्यासाठी वेळ मारून नेणे ही मोठी खेदजनक बाब आहे. मुंबईत असंख्य ठिकाणी सरकारची कार्यालये आणि त्या ठिकाणी समितीला सहज जागा देता येऊ शकते. त्यामुळे या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून समितीला पुण्याऐवजी मुंबईत कार्यालय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली, त्याकडेही अधिकारी वर्गाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे काही सदस्यांचे म्हणणे आहे.

पुण्यात उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयात एका ठिकाणी एक केबिन इतकी जागा समितीला दिली जाणार असल्याचे आश्वासन विभागाकडून देण्यात आले आहे. यासाठी काम सुरू असल्याचे मागील एक वर्षाहून अधिक काळ उत्तरे दिली जात आहेत. मात्र नेमके हे कार्यालय कधी दिले जाईल यावर विभागातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे पुण्यातील उच्च शिक्षण विभागाच्या उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या संदर्भात उच्च शिक्षण विभागाच्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT