ST Bus esakal
महाराष्ट्र बातम्या

मराठा आंदोलक आक्रमक! जालना, बीड एसटी वाहतूक बंद; पोलिसांना विचारूनच एसटी बसगाड्यांची वाहतूक

जालन्यातील लाठीहल्ल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरातून त्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ रास्तारोको, आंदोलने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर बीड व जालन्याला जाणारी एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पोलिसांच्या सूचनांनुसार एसटी वाहतूक सुरु किंवा बंद ठेवली जात आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जालन्यातील लाठीहल्ल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरातून त्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ रास्तारोकोसह विविध प्रकारे आंदोलने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर बीड व जालन्याला जाणारी एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पोलिसांच्या सूचनांनुसार एसटी वाहतूक सुरु किंवा बंद ठेवली जात आहे. सद्य:स्थितीत अंशत: बससेवा सुरु असल्याचे राज्यभर चित्र आहे. सोलापूरसह विविध जिल्ह्यांमध्ये रास्तारोको केले जात आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे आमरण उपोषण सुरु केले होते. पण, शुक्रवारी पोलिसांनी तेथील लोकांवर लाठीहल्ला केला आणि त्यात काहीजण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पण, शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या या आंदोलकांवर लाठीहल्ला कशासाठी करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या लाठीहल्ल्याची बातमी राज्यभर वाऱ्यासारखी पसरली आणि शुक्रवारी रात्रीपासून राज्यभरातील मराठा बांधव रस्त्यावर उतरला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, शनिवारी मराठा बांधवांनी सोलापूरसह वेगवेगळ्या जिल्ह्यातील महामार्गांवर रास्तारोको केले. अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलने सुरुच आहेत. लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सरकारवर हल्लाबोल केला जातोय. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून खबरदारी घेतली जात आहे.

जिल्हाअंतर्गत वाहतूक सुरु, पण परजिल्ह्यातील वाहतूक ठप्प

प्रत्येक विभागाअंतर्गत जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गांवरील आंदोलनाचा आढावा घेतला जात आहे. ज्याठिकाणी वातावरण निवळले आहे, त्याठिकाणची जिल्हाअंतर्गत बससेवा सुरु आहे. पण, परजिल्ह्यात बसगाड्या जाण्यापूर्वी त्या जिल्ह्यातील आंदोलनाच्या स्थितीचा आढावा एसटी महामंडळाकडून घेतला जात आहे. तसेच पोलिसांच्या सूचनांनुसार बसगाड्या सोडल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT