Agriculture Minister Abdul Sattar  
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar : मी कुत्रा निशाणीवरही निवडून येतो...कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचे अजब वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे कृषीमंत्री अद्बुल सत्तार नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतात. दरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी अजब वक्तव्य केलं आहे. जे सध्या चर्चेत आलं असून विरोधीपक्ष त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहे. मला कुत्रा निशाणी मिळाली तरीही मी निवडून येतो. असं वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. (agriculture minister abdul sattar said i am getting elected on the sign of dog )

मंगरुळपिर येथे २३ सप्टेंबर रोजी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रेच्या दरम्यान मंगरुळपिर येथे आले असता येथील जुन्या पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित सभेच्या वेळी सत्तार बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आम्हाला दोन मिनिटेसुद्धा भेटत नव्हते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री दोन वाजतासुद्धा भेटतात, माझ्या सिल्लोड मतदारसंघात सव्वातीन लाख हिंदू मतदार आहेत तर ५० हजार मुस्लिम मतदार आहेत आणि मी मुस्लिम असूनसुद्धा गेल्या २५ वर्षांपासून निवडून येत आलो आहे. मला जर ‘कुत्रा’ निशाणीवर उभे केले तरीही मीच निवडून येतो कारण की कुत्रासुद्धा मालकासोबत वफादार असतो असे सत्तार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला.

तसेच, मी अगोदर काँग्रेसमध्ये होतो. नंतर एकनाथ शिंदे साहेबांमुळे शिवसेनेत आलो, परंतु हिंदू विचारसरणीवाल्या उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मी काँगेस सोडून शिवसेनेत आलो आणि ह्यांनी परत काँगेस सोबत हातमिळवणी केली. त्यामुळे आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हा ४० जणांना घेऊन भाजप सोबत सरकार स्थापन केले. असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.

परंतु त्यांच्या या वक्तव्याचा येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला असून सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT