Abdul Sattar Sakal
महाराष्ट्र बातम्या

कृषी मंत्रालयातून अधिकाऱ्यांना 15 कोटी वसुलीचे टार्गेट? धमकीचे Call Viral

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात होणाऱ्या सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटी रूपये जमा करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले असल्याची माहिती समोर आली आहे. तर ही वसुली करण्यासाठी मंत्रालयातून दबाव आणला जात असल्याची माहिती आहे. तर प्रत्येक अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी याद्या पाठवण्यात आल्या असल्याचं वृत्त सकाळ अॅग्रोवनने दिलं आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कृषीमंत्र्यांच्या कार्यालयातील गृह खाते आणि महसूल खात्याच्या दोन अधिकाऱ्यांना महोत्सवासाठी पैसे गोळा करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. हे अधिकारी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना दमदाटी आणि धमक्या देत निलंबन करण्याचा धाक दाखवत आहेत. तर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी राज्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांना केलेल्या फोनचे ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून हा सध्या चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

सिल्लोड महोत्सवाचे पास

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानसभा मतदारसंघात १ ते १० जानेवारी दरम्यान सिल्लोड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन असल्याचं भासवून पैसे गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बियाणे विक्रेते, खते, किटकनाशके, कृषी उद्योग कंपन्या, संघटना, यंत्रे पुरवठादार यांच्याकडून हे पैसे गोळा करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे.

"कृषी आयुक्तांनी आम्हाला एका बैठकीसाठी बोलावले होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला सिल्लोड महोत्सवासाठी पैसे गोळा करावे लागतील असं सांगितलं. यावेळी कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी विकास अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक, संचालक उपस्थित होते." अशी माहिती एका संचालकाने दिली आहे.

या दबावामुळे अनेक कृषी खात्यातील अधिकारी तणावाखाली आले असून आपल्याला दिलेले टार्गेट एका महिन्याचा पगार आणि त्यात काही रक्कम टाकून पूर्ण करण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे. तर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या फोन कॉलचे डिटेल्स तपासले तर कोट्यावधींचा घोटाळा बाहेर येऊ शकतो असं मंत्रालयातील सुत्रांनी सांगितलं आहे.

काय आहे टार्गेट

आपापल्या विभागातून या महोत्सवात स्टॉल लावणारे वेगवेगळ्या रक्कमेच्या प्रवेशिका आणण्याचे टार्गेट या अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामध्ये २५ हजार, १५ हजार, १० हजार आणि ७ हजार ५०० अशा प्रवेशिकांचा सामावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Nanded Dasara: नांदेडमध्ये दसरा महोत्सव उत्साहात; हल्ला-महल्ला मिरवणुकीत हजारो शीख भाविकांचा सहभाग

Pune Crime : टीव्ही बंद करायला सांगितला म्हणून केली वडिलांची हत्या; ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोथरुड मध्ये खळबळ

Teacher Recruitment: मराठवाड्यात शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! ४५७ समन्वयक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा १ ते ५ डिसेंबर

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील हप्ता पडणार लांबणीवर

SCROLL FOR NEXT