मालेगाव (जि. नाशिक) - बांधावर जात शुक्रवारी शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषिमंत्री दादा भुसे. 
महाराष्ट्र बातम्या

कृषिमंत्री दादा भुसे आता थेट बळिराजाच्या बांधावर!

सकाळवृत्तसेवा

मुंबई - शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘कृषिमंत्री एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राबविण्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी नुकतेच नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी आठवडाभराच्या आतच कृषिमंत्र्यांनी केली असून, आज त्यांनी मालेगाव तालुक्‍यातील वळवाडे, अजंग-वडेल, झोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

गावात कृषी अधिकारी, कृषी साहाय्यक येतात का, अशी विचारणाही यावेळी कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केली. शेतकऱ्यांना कृषी उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता एक दिवस शेतावर हा उपक्रम कृषिमंत्री भुसे यांनी सुरु केला असून, कृषी सचिव, आयुक्त यांनी 15 दिवसांतून एकदा, तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशा सूचना केल्या आहेत.

या भेटीत पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत चर्चा करतानाच उपलब्ध बाजारपेठ आणि विविध कृषी योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असेही भुसे यांनी विभागाला सांगितले आहे. 

मालेगाव तालुक्‍यातील वळवाडे येथील शांताराम गवळी या शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन भुसे यांनी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीक विमा योजना, कांदा उत्पादन याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तुमच्या समस्या जाणून घेण्याकरिता कृषी साहाय्यक, कृषी अधिकारी तुमच्याकडे येतात का, अशी विचारणाही कृषिमंत्र्यांनी यावेळी केली. भुसे यांनी आज दिवसभरात शेतकऱ्यांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Shiv Sena Leader Death : शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने उचललं टोकाचं पाऊल, शेती पिकत नसल्याने घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा

ST Bus: एसटी प्रवासात NCMC कार्ड अनिवार्य; फक्त ३ दिवस बाकी, आताच करा 'हे' काम, अन्यथा सवलत रद्द

SCROLL FOR NEXT