weather 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात वादळी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : विदर्भातील वनी (जि. यवतमाळ) परिसरात गुरुवारी (ता. ५) पहाटे तीन वाजता मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडला. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने शुक्रवारपासून (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भासह राज्यात ढगाळ वातावरण होत असून, गुरुवारी दुपारनंतर उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड येथेही ढग गोळा झाले होते. विदर्भाच्या विविध भागांत उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पंजाबपासून राजस्थान, पश्‍चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत  हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दक्षिण कर्नाटकपासून दक्षिण श्रीलंकेपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोमवारपर्यंत (ता. ९) राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

गुरुवारी (ता. ५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.४, जळगाव ४२.२, कोल्हापूर ३७.१, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४१.६, नाशिक ४०.१, सांगली ३८.४, सातारा ३८.५, सोलापूर ४०.७, मुंबई ३२.०, अलिबाग ३१.५, रत्नागिरी ३२.४, डहाणू ३३.३, उस्मानाबाद ४०.३, आैरंगाबाद ३९.२, परभणी ४१.६, नांदेड ४१.५, अकोला ४२.६, अमरावती ४१.२, बुलडाणा ३९.५, चंद्रपूर ४३.२, गोंदिया ३९.६, नागपूर ४०.९, वर्धा ४१.५, यवतमाळ ४१.५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT