Agriculture State Award  
महाराष्ट्र बातम्या

Agriculture State Award : राज्यकृषी पुरस्कार सोहळ्यात शेतकऱ्यांचा राडा! उशीर झाल्याने शेतकरी संतापले... कृषी मंत्र्यांनी घातली समजूत

Agriculture State Award Latest News : एनएससीआय डोम येथे कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात शेतकऱ्यांनी गोंधळ केला आहे.

रोहित कणसे

राज्याच्या कृषी पुरस्कार सोहळ्यात राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम नियोजित होता. मात्र या कार्यक्रमाला उशीर झाल्याने तसेच राज्यपालांकडून अत्यंत कमी वेळ देण्यात आल्याने नाराज शेतकऱ्यांनी गोंधळ करण्यासा सुरूवात केली. यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. यावेळी नाराज शेतकऱ्यांनी मात्र गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले.

कार्यक्रमाला उशीर झाल्याने राज्यपालांच्या हस्ते काही शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आला. यानंतर राज्य शासन देत असलेला पुरस्कार आम्हाला राज्यपालांच्या हस्तेच हवा आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं होते. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊ असे आश्वासन दिल्यामुळे शेतकरी शांत झाले. पण याआधी शेतकऱ्यांनी फेटे स्टेजच्या दिशेने फेकत गोंधळ घातल्याचा पाहायला मिळाले.

या पुरस्कार सोहळ्यात राज्य शासनातर्फे सन २०२० ते २०२३ या वर्षीच्या ४४८ पुरस्कार्थींचा पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम होणार आहे. नऊ विभांगामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी आणि कर्मचारी यांना हे कृषी सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.

शेतीमधील उत्पादकता आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राज्य शासनाकडून पुरस्कार दिले जातात. हा कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते वरळीतील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (डोम) येथे होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT