Ahemadnagar Crime News esakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News : पत्नीसह दोन मुलींच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं; नगरमध्ये थरकाप उडवणारी घटना

Ahmednagar Crime News : अज्ञात कारणावरून पत्नी आणि दोन मुलींच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिल्याची घटना अहमदनगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे सोमवारी (दि.२५) सकाळी ९ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी सुनील गोरख लांडगे (रा. पिंपळगाव लांडगा, ता.नगर) यास ताब्यात घेतले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ahmednagar Crime News : अज्ञात कारणावरून पत्नी आणि दोन मुलींच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिल्याची घटना अहमदनगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे सोमवारी (दि.२५) सकाळी ९ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी सुनील गोरख लांडगे (रा. पिंपळगाव लांडगा, ता.नगर) यास ताब्यात घेतले आहे.

आरोपी सुनील लांडगे हा त्याची पत्नी लीलाबाई, एक १४ वर्षाची मुलगी साक्षी व अवघे ९ महिने वयाची मुलगी खुशी यांच्यासह पिंपळगाव लांडगा गावात राहात होता. सोमवारी (दि.२५) सकाळी ९ च्या सुमारास अज्ञात कारणावरून त्याने घरात पत्नी लिलाबाई, मुली साक्षी आणि खुशी यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले.

क्षणात आगीचा भडका होऊन त्या तिघी मायलेकी गंभीररित्या भाजून मयत झाल्या. या अमानवी कृत्यानंतर आरोपी घराबाहेर येवून बसला. परिसरातील नागरिकांना ही दुर्दैवी घटना समजताच त्यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली.

ही माहिती मिळताच स.पो.नि. प्रल्हाद गिते हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून आरोपी सुनिल लांडगे यास ताब्यात घेतले. तर मायलेकींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले.

दरम्यान, सुनील लांडगे यानं हे अमानूष कृत्य का केलं, याचा शोध नगर तालुका पोलीस घेत आहेत. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP number plate Fake : बनावट एचएसआरपी नंबरप्लेट कारखान्यावर छापा, यंत्रसामग्री जप्त; एकास अटक

Water Project : खडकवासला ते फुरसुंगी पाणी प्रकल्पचा एक किलोमीटर बोगदा पूर्ण; चार ठिकाणी खोदाई

Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठा बदल, कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज, तुमच्या भागांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : दिग्दर्शक नीरज पांडे यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

मोठी बातमी! ३१ डिसेंबर २०२६ रोजी ६ वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार इयत्ता पहिलीत प्रवेश, अंतिम सत्र परीक्षा १५ एप्रिलनंतर होणार, वाचा...

SCROLL FOR NEXT