महाराष्ट्र बातम्या

Fake Degree:राज्यात 'मुन्ना भाईं'चा सुळसुळाट! बनावट प्रमाणपत्रांचा शासकीय नोकरीसाठी वापर? नगरमध्ये गुन्हा दाखल

बोगस प्रमाणपत्रांची व्याप्ती राज्यभर ! नाशिक, नगरमध्ये गुन्हा दाखल : नाशिक पोलिस तपासासाठी नगरमध्ये दाखल

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar Fake Certificate case: दहावी, बारावी बोर्डासह कोणत्याही शाखेच्या पदवीचे व डिप्लोमाच्या बोगस प्रमाणपत्रांची सर्रास विक्री होत असून, हे रॅकेट राज्यभर असल्याची शक्यता आहे. बनावट प्रमाणपत्र आढळल्यानंतर नगरमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता नाशिकमध्येही पॅरामेडीकलच्या अभ्यासक्रमाची बोगस प्रमाणपत्र आढळून आले असून, यामध्ये नाशिकसह सोलापूर, सांगली येथील विद्यार्थ्यांची बनावट प्रमाणपत्र असल्याची माहिती समोर आली आहे.

नगरमधील बालिकाश्रम रस्त्यावरील पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या चालकाकडून पोलिसांनी तब्बल १८२ प्रमाणपत्रे जप्त केली होती. अशोक नामदेव सोनवणे (वय ३७, रा.भिंगार, अहमदनगर) या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली होती.

नगरच्या न्यायालयाने सोनवणे याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बनावट पदव्या व गुणपत्रके दिल्ली येथील ओळखीच्या सचिन (पूर्ण नाव माहित नाही) व चेतन शर्मा या दोघांकडून कुरिअरने मागवित असल्याची माहिती सोनवणे याने पोलिसांना दिली होती. त्यानंतर तोफखाना पोलिसांना या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाता आले नाही.

दरम्यान, आता नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांचे २० प्रमाणपत्र बनावट निघाल्याने नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (ता.२७) नाशिक तालुका पोलिस ठाण्याचे पथक नगरमध्ये तपासासाठी आले होते. त्यांनी पुढील तपासासाठी तोफखाना पोलिसांनी जप्त केलेले प्रमाणपत्र व इतर माहिती घेतली. (Latest Marathi News)

दिल्ली कनेक्शन समोर

अशोक नामदेव सोनवणे याने ४० ते ५० हजार रुपयांमध्ये दहावी, बारावी व पदवीचे प्रमाणपत्र विक्री केल्याचे तपासात उघड झाले आहे. ही प्रमाणपत्रे दिल्ली येथून कुरिअरने सोनवणे बोलवित होता. नाशिकच्या गुन्ह्यातही सोनवणे याचे नाव आल्याने नाशिक तालुका पोलिसांनी त्याला नगरमधून अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले.

शासकीय नोकरीसाठी वापर?

बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे अनेकांनी शासकीय नोकरी लाटल्याची शक्यता आहे. पोलिस जप्त करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारे तपास करीत आहेत. बनावट प्रमाणपत्राचा शासकिय नोकरी मिळविण्यासाठी वापर झालेला आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे २० प्रमाणपत्र बनावट आढळून आल्याच्या गुन्ह्याच्या तपासासाठी नाशिक तालुका पोलिस आले होते. नगरमधून एका आरोपीला अटक करण्यात आली - मधुकर साळवे, पोलिस निरीक्षक, तोफखाना (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

April Fool Day 2026: एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरी केला जातो एप्रिल फूल्स डे? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'ओडिशा स्थापना दिना'निमित्त दिल्या शुभेच्छा

Ahilyanagar Murder Case: खूनप्रकरणी बापलेकाला शिक्षा; अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल, एकास सक्तमजुरी!

हीच तर खरी संस्कृती! प्रियांका चोप्राने सुवर्ण मंदिरात जमिनीवर बसून सगळ्यांसोबत घासली भांडी, देसी गर्लच्या सेवेचं कौतूक, Viral Video

SCROLL FOR NEXT