Air quality index 
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रातील या शहराची लंडन, टोकियोपेक्षा हवा आहे शुद्ध

सकाळवृत्तसेवा

मुंबई - लॉकडाउन सुरू झाल्यापासून मुंबई शहरातील वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मुंबईने मंगळवारी पाच वर्षांतील सर्वांत शुद्ध हवा अनुभवल्याचा दावा ‘सफर’ने केला आहे. हवेच्या गुणवत्तेत मुंबईने लंडन, सिंगापूर, टोकियो, सिडनी या शहरांनाही मागे टाकल्याचे सांगण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रात्रभर पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा अनुभव सध्या मुंबईकर घेत आहेत. त्यातच मंगळवारी मुंबईत प्रदूषणाची सर्वांत कमी पातळी नोंदवण्यात आली. वायू गुणवत्ता निर्देशांकानुसार (एक्‍यूआय) २०१५ नंतर सर्वाधिक शुद्ध हवेत मुंबईकरांनी श्‍वास घेतला.  

कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने सध्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ नाही. मुंबईत सोमवार रात्र ते मंगळवारी पहाटेदरम्यान मुसळधार पावसामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले होते. ताशी ३० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी प्रदूषके वाहून नेली, असे ‘सफर’चे (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी, वेदर फोरकास्टिंग ऍण्ड रिसर्च) संचालक गुफरान बेग यांनी सांगितले.

येत्या काही दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे ‘एक्‍यूआय’ आणि हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी राहण्याची शक्‍यता आहे.
- गुफरान बेग, संचालक, सफर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT