महाराष्ट्र बातम्या

‘एअर इंडिया’ करणार इतर विमानांचीही  दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एआयईएसएल) मेटेंनन्स रिपेअर अँड ओव्हरहॉलतर्फे (एमआरओ) एअर इंडियाच्या सर्व विमानांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. या कंपनीच्या विस्तारासाठी इतर कंपन्यांच्या विमानांच्या दुरुस्ती व देखभालीचे कंत्राट मिळण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

स्पाइसजेटच्या विमानांचे कंत्राट थिरुअनंतपुरम येथील एमआरओकडे आहे. मुंबईतील एमआरओच्या माध्यमातून कंपनीला वार्षिक शंभर कोटीपेक्षा जास्त महसूल २०१८-१९ या एक वर्षाच्या कालावधीत मिळाला आहे. 

एअर इंडियाकडे असलेल्या एअरक्राफ्ट रिकव्हरी युनिटच्या माध्यमातून मुंबई व शिर्डी विमानतळावर अडकलेले स्पाइसजेटचे विमान हटविणे शक्‍य झाले होते. काठमांडू विमानतळावर अडकलेले तुर्की एअरलाइन्सचे विमान हटविण्याचे कामदेखील या विभागामार्फत यापूर्वी करण्यात आले आहे. या कंपनीच्या माध्यमातून ‘एअर इंडिया’ला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत आहे, अशी माहिती मुंबई कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

भाड्यापोटी वर्षाला १०० कोटींचे उत्पन्न
कंपनीच्या नरिमन पॉइंट येथील दिमाखदार २३ मजली इमारतीमधील जागा विविध आस्थापनांना भाडेकराराने देण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून कंपनीला वार्षिक १०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT