solapur collector and dcm fadanvis solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरची विमानसेवा 2 महिन्यांत सुरू होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘DGCA’कडून विमानतळ पाहणीसाठी लवकरच पथक पाठवू; लाईट केलिब्रेशन व्यवस्थित

सोलापूरकरांना लवकरच विमानसेवा देण्यासाठी मी स्वत: प्रयत्नशिल असून हे पथक लवकरात लवकर सोलापुरात यावे, यासाठी मी स्वत: संबंधितांशी बोलेन, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा करण्यासाठी परवाना जरूरी असून त्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हीएशन/डीजीसीए) विमानतळाची पाहणी आवश्‍यक आहे. त्यासाठी लवकर सोलापूरला पथक पाठवावे, अशी मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावेळी सोलापूरकरांना लवकरच विमानसेवा देण्यासाठी मी स्वत: प्रयत्नशिल असून हे पथक लवकरात लवकर सोलापुरात यावे, यासाठी मी स्वत: संबंधितांशी बोलेन, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.

श्रीक्षेत्र अरण (ता. माढा) येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा व भक्तनिवास वास्तुशिल्प भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. होटगीरोड येथील विमानतळावर विमानाने त्यांचे आगमन झाले. अरण येथील कार्यक्रम संपवून जाताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी होटगीरोड विमानतळावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी सोलापूरच्या विमानसेवेबद्दल चर्चा केली. विमानतळाच्या कामांची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून घेतली.

होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरणारी सिध्देश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हेच दुसऱ्यांदा आज विमानाने या विमानतळावर दाखल झाले होते. यापूर्वी सांगोला येथे जाण्यासाठी ते होटगीरोड विमानतळावर आले होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, विमानसेवेसाठी आवश्‍यक असलेली धावपट्टी, संरक्षक भिंत व प्रशासकीय इमारतीचे कामकाज पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच येथून विमानसेवा सुरू होईल.

लाईट केलिब्रेशन व्यवस्थित

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने (एअरपोर्ट ॲथोरेटी ऑफ इंडिया) शनिवारी होटगी रोड विमानतळावर नव्याने केलेल्या धावपट्टीची व लाईट कॅलिब्रेशनची चाचणी व्हीटीसीएनएस बी-३५० या विमानाद्वारे करण्यात आली. या चाचणीत काही किरकोळ त्रुटी निघाल्या, त्या त्रुटी तत्काळ दूर केल्या आहेत. विमानसेवा परवान्यासाठी 'डीजीसीए'कडून पाहणी व या पाहणीतील त्रुटींची पुर्तता आवश्‍यक आहे. या प्रक्रियेला विलंब लागण्याची शक्यता गृहित धरून ही प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी तुम्ही स्वत: लक्ष घालावे अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही

सोलापूरकरांना अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेली विमानसेवा आता अंतिम टप्प्यात आहे. होटगीरोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेला परवाना ऑक्टोबरपर्यंत मिळेल अशी अपेक्षा आहे. विमानसेवेचा परवाना, विमानकंपनी या सर्व प्रक्रियेत मी स्वत: वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT