Ajit Pawar and Jayant Patil 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांसोबत ९ आमदार! बाकीचे शपथविधी पाहायला गेले होते; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

Ajit Pawar Latest News- महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा भुकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. शिवाय अजित पवार यांनी आठ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली.

मात्र त्यांच्या बंडाला शरद पवार यांचा विरोध असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.

यावेळी जयंत पाटील यांनी अनेक मुद्दयांवर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे जोरात चालले होते. शिवाय ते कोणाचे ऐकत नव्हते. त्यामुळे काही लोकांना एकनाथ शिंदेंचा राग असावा. त्यामुळेच त्यांना पर्याय निर्माण करण्यासाठी बंड घडवून आणल्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेतून जाताना काय बोलले होते की, अजित पवार यांच्यामुळे अन्याय झाला. आता अजित पवार तिकडे गेल्यामुळे त्यांना परत जायला संधी आहे. असो. पण अजित पवार यांनी विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला हे पक्षाला कळवले असते तर बरे झाले असते, असंही ते म्हणाले.

दरम्यान विधान सभा निवडणुकीला वर्ष आहे. मात्र नव्याने निवडणूक लागण्याची शक्यता आहे. पवारसाहेब म्हणाले पाच आमदार राहिले तरी पक्ष वाढवला.

शरद पवारसाहेब, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांनी बरोबर राहण्याची भूमिका घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत केवळ ८ आमदार आहेत. ज्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बाकीचे फक्त शपथविधी पाहण्यासाठी गेले होते, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT