omicron esakal
महाराष्ट्र बातम्या

''महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाश्यांना 'हे' नियम पाळावेच लागतील''

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोरोनाचा (coronavirus) ओमिक्रॉन व्हेरियंट (omicron variant) 25 देशांमध्ये पसरलाय. अजूनही याचा प्रसार वाढेल असा इशारा WHO ने दिला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा शोध लागण्याआधीच त्याचा भारतात प्रसार झाला असण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाश्यांसाठी काही नियम पाळावेच लागतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

नियम सर्वांसाठी सारखे असावेत

आपल्या नियमावलीत तफावत होती. मात्र, नियम एकसारखे हवेत, त्यामुळं भारतातील कोणत्याही विमानतळावर प्रवासी आले. तर त्यांच्यासाठी नियम सर्वांसाठी सारखे असावेत यासाठी बदल करण्यात आलेले आहेत. इतर राज्यातून येताना दुसऱ्या राज्यात जाताना आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागतो तर आपल्याकडे येताना रिपोर्ट दाखवावा लागेल. परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी RTPCR अनिवार्य करण्यात आली असून आता केंद्राशी चर्चा करुनच आता नवीन नियमावली येईल, असंही अजित पवार म्हणाले कोरोनाच्या तिसऱ्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आपण काळजी घेतलेली बरी, असं अजित पवार म्हणाले.

शाळांच्या संदर्भात अजित पवार म्हणाले...

शाळांच्या संदर्भात शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा झाली. आमची यावर चर्चा झाली होती, त्यावेळी हा नवा विषाणू नव्हता. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दाही महत्वाचा आहे. आता शिक्षणमंत्री याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलतील, त्यानंतर त्यावर निर्णय होईल, असं अजित पवारांनी सांगितलं. शाळांबाबत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगवेगळे नियम आहेत. सर्वत्र सारखे नियम असावेत, यासाठी केंद्राशी चर्चा करु, असंही ते म्हणाले. नव्या विषाणूबाबत वेगवेगळी मतं आहेत. हा विषाणू वेगानं पसरतो मात्र सौम्य आहे, असं तज्ञांचं मत आहे. कधी कधी घेतलेले नियम मागे घ्यावे लागतात, असंही ते म्हणाले.

"माझ्यासारख्या राज्यातल्या नेत्यांनी त्यावर बोलायची गरज नाही"

ममता बॅनर्जी आणि शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. राष्ट्रीय नेत्यांनी बोलल्यानंतर माझ्यासारख्या राज्यातल्या नेत्यांनी बोलायची गरज नाही, असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमपीएससीतील नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

टास्क फोर्ससोबत सल्लामसलत करुन निर्णय घेऊ

मुख्यमंत्र्यांनी, मुंबईच्या महापौैरांनी, देशपातळीवर नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलं आहे. त्यामुळं नियम बदलण्यात आलेले आहेत. त्या त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन टास्क फोर्ससोबत सल्लामसलत करुन निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.

एसटी आंदोलनावर बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांना होणाऱ्या त्रासाचा आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी विचार करावा. आम्ही त्यांच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा केली. एसटी आंदोलनाला तुटेपर्यंत ताणू नये असं पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT