Ajit Pawar alleged Jayant Patil did not keep his word to Prakash Solanke in NCP Melava In Karjat political news  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar News : जयंत पाटलांनी तो शब्द पाळला असता तर.. ठाकरे सरकारच्या पडद्यामागच्या घडामोडींचा अजितदादांनी केला खुलासा

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून कर्जत येथे नेते कार्यकर्त्यांचा विचारमंथम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अजित पवारांचं जोरदार भाषण झालं. यावेळी बोलताना २०१९ रोजीचा एक किस्सा सांगितला आहे. पक्ष सत्तेत आला तेव्हा प्रकाश सोळंखे नाराज होते आणि जयंत पाटलांनी त्यांना तेव्हा दिलेला शब्द पाळला नाही असा गोप्यस्फोट अजित पवारांनी केला.

तेव्हा मंत्रिपद मिळालं नाही म्हणून प्रकाश सोळंखे नाराज होते. ते राजीनामा द्यायला निघाले होते. तेव्हा मी (अजित पवार) आणि जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली. तेव्हा जयंत पाटील यांनी प्रकाश सोळंखे यांना दिलेला शब्द पाळला नाही असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, मी जे बोलतो त्यातलं एक अक्षरही खोटं बोलणार नाही. ज्यावेळेस राज्यात पक्षाचं सरकार आलं तेव्हा प्रकाश सोळंके नाराज झाले. त्यांना सरकारच्या मंत्रिमंडळात यायचं होतं. अशोक डक, मी, प्रकाश सोळंके आणि जयंत पाटील आणि काही वेळा धनंजय मुंडे यांच्या बैठका होत असतं. तेव्हाच्या बातम्या काढून पाहा सोळंके यांनी राजिनामा देण्याचा निर्णय घेतला होता.

मंत्रिपद दिलं गेलं नाही म्हणून प्रकाश सोळंके नाराज होते. शेवटी मी आणि जयंत पाटलांनी त्यांना समजून सांगितलं. नंतर मी आणि जयंत पाटलांनी त्यांना कार्यध्यक्षपदाचा शब्द दिला. जयंत पाटील यांनी त्यांना सांगितलं की, एक वर्ष मी अध्यक्ष राहतो, एक वर्षानी तुम्ही कार्याध्यक्षाचे अध्यक्ष व्हा. हे प्रकाश सोळंके यांनी ऐकलं. ही २०१९ सालची गोष्ट आहे. त्यानंतर एक वर्ष झालं, पण वरिष्ठ तुम्हीच व्हा असं म्हणतात असे जयंत पाटील म्हणाले. ते पुढे ढकलंत चाललंच आहे. माझं म्हणणं आही शब्द दिला की एखादा माहिना पुढे मागे ठिक आहे. पण असं कार्यकर्त्यांना नाराज करणं मला आवडत नाही, अशा गोष्टी साचत राहतात असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT