Sub-Inspector Police Convocation Ceremony sakal
महाराष्ट्र बातम्या

कामगिरीने पदाचा गौरव वाढवावा

अजित पवार यांचे पोलिस उपनिरीक्षकांना दीक्षांत सोहळ्यात आवाहन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी दहशतवादी अजमल कसाब यास जिंवत पकडल्याने महाराष्ट्र पोलीस दलाची शान वाढली. तसेच पद अन्‌ कामगिरीने माणूस हा सरस ठरत असल्याने पोलीस उपनिरीक्षकांनी पदाचा गौरव चांगल्या कामगिरीद्वारे वाढवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११९ व्या तुकडीचा दीक्षांत आणि संचलन सोहळा झाला. यावेळी पवार बोलत होते. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार, पोलिस अकादमीचे संचालक राजेशकुमार आदी उपस्थित होते. या सोहळ्यात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी व बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच सोर्ड ऑफ रिव्हॉलवरचा मान गणेश चव्हाण यांना देवून उपमुख्यमंत्र्यांनी गौरविले. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी महिला पुरस्काराचा मान तेजश्री म्हैसाळे यांना मिळाला. द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार विशाल मिंढे यांना तर स्टडीज सिल्व्हर बॅटेन पुरस्काराने प्रतापसिंह डोंगरे यांना गौरविले.

मुख्यमंत्र्यांसह गृहराज्यमंत्री अनुपस्थित

उपनिरीक्षकांच्या दीक्षांत अन्‌ संचलन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील (शहर) आणि शंभुराजे देसाई (ग्रामीण) हे उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री ऑनलाइन उपस्थित राहतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्र्यांसह गृहराज्यमंत्री अनुपस्थित राहिले.

उपमुख्यमंत्र्यांच्या काही ठळक घोषणा

  • महाराष्ट्र पोलिस अकादमीतील सराव इमारतीला शंभर टक्के निधी देणार

  • राज्यातील जुन्या ८७ पोलिस ठाण्याचे नूतनीकरण

  • प्रत्येक पोलिस शिपाई हा अधिकारी होऊन होणार सेवानिवृत्त

  • पोलिसांना आता आठ तासांची ड्यूटी

  • टप्प्याटप्प्याने राज्यात पोलिसांसाठी १ लाख घरे बांधणार

  • अर्थसंकल्पामध्ये पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी १ हजार २९ कोटींची तरतूद

महाराष्ट्र पोलिस अकादमीत आल्यानंतर प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासूनच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचे ठरवले होते. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून हा माझ्यासह कुटुंबासाठी आनंदाचा क्षण आहे..

- गणेश चव्हाण (सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, कुर्डुवाडी, जि.सोलापूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT