Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: दिलदारपणाचं दुसरं नाव अजितदादा! शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना म्हणाले...

आजितदादांचा मोठं मन, शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना दिलं मोठं आश्वासन

अंकिता खाणे (Ankita Khane)

अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. 30 आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. नऊ आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार शिवसेना- भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.(Latest Marathi News)

तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या काही आमदारांनी आता अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आमदारांमधील काही दिग्गज आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांना पाठींबा देणाऱ्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे.(Latest Marathi News)

तर शरद पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्याकडून 'तुम्ही माझेच आमदार आहात, सोबत जरी नाही आलात तरी सर्वतोपरी मदत करू' असे आश्वासन शरद पवार यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना दिल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.(Latest Marathi News)

तर काही आमदारांनी शरद पवार यांच्या बरोबर राहणार असून अजित पवार यांच्याबरोबर येऊ शकत नाही असं सांगून आल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. तरीदेखील अजित पवार यांनी पाठिंबा न देण्याऱ्या नेत्यांना, आमदारांना काम करण्याचं आश्वासन अजित पवारांकडून देण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT