Ajit Pawar Balasaheb Thorat may meet CM Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde| अजित पवार, थोरात घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट, काय आहे भेटीमागचं गुपित?

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या भेटीमागचं नेमकं गुपित काय अशी चर्चा सुरू राजकीय वर्तुळात रंगली आहे.(Ajit Pawar Balasaheb Thorat may meet CM Eknath Shinde )

राज्यात सत्तांतरानंतर लांबलेला मंत्रिमंडळाचा विस्तार १० ऑगस्ट रोजी झाला. त्यास ३० दिवस होऊन गेले तरी पालकमंत्री नियुक्त झाले नाहीत. त्याचा फटका जिल्ह्यातील विकास योजनांना बसत आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत होणाऱ्या कामांना ब्रेक लागला आहे.

दरम्यान, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. लम्पी रोग, थांबलेला निधी आणि स्थगिती दिलेल्या कामांसंर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

२०२२-२३ आर्थिक वर्षातील सहावा महिना सुरू झाला असला तरी जिल्ह्यातील ५०० कोटींच्या कामांना अजूनही मंजुरी मिळालेली नाही. आणि आता नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होणार असे म्हटले जात आहे. त्याच वेळी पालकमंत्री नियुक्त होऊ शकतात.

जिल्ह्यातील प्रशासकीय निर्णयाचे सर्वाधिकार पालकमंत्र्यांकडे एकवटलेले असतात. म्हणून मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे काही आमदार अत्यंत कमी महत्त्वाच्या मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद मिळाले तरी चालेल, पण कोणत्याही जिल्ह्याचा पालकमंत्री बनवा, असा आग्रह मुख्यमंत्री, पक्षाकडे करत असतात. पण शिंदे-फडणवीस सरकारने न्यायालयीन लढाई, काँग्रेसचा एक गट भाजपमध्ये येणार, विधान परिषदेवर १२ आमदारांची नियुक्ती, पितृपक्ष अशी कारणे दाखवून एवढ्या महत्त्वाच्या नियुक्त्या अजूनही केलेल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

Pune News : मध्य रेल्वेत चोरीचा सुळसुळाट; १६ दिवसांत मोबाईल व मंगळसूत्र चोरी

Latest Marathi News Live Update : दादर येथील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा

'ढोंगी साध्वी' ना भगवे कपडे ना गळ्यात कोणत्या माळा, संन्सास घेणारी ममता कुलकर्णी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये Viral Video

IPL 2026: 'विराट-रोहितला जसा पर्याय नाही, तसाच संजू सॅमसनलाही...'; राजस्थान रॉयल्सच्या ट्रेडवर काय म्हणाला नवा कर्णधार?

SCROLL FOR NEXT