Adani Group Hindenburg Report Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Adani Group बाबत अजितदादांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही'

जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही.

सकाळ डिजिटल टीम

अदानी समूहाच्‍या अनुषंगानं माजी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्‍यासह इतर विरोधी पक्षांनी संयुक्‍त संसदीय समितीच्‍या स्थापनेची मागणी केलीये.

सातारा : अदानी उद्योगसमूहाच्‍या (Adani Group) अनुषंगानं आलेल्‍या हिंडेनबर्ग अहवालाची (Hindenburg Report) चौकशी करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाने समिती नेमण्‍यास मान्‍यता दिली आहे. त्‍यानुसार ती नेमल्‍यानंतर वस्‍तुस्‍थिती समोर येईल. तोपर्यंत उगीचच कोणालाही आरोपीच्‍या पिंजऱ्यात उभं करणं बरोबर नसल्‍याचं मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सातारा इथं माध्यमांशी बोलताना नोंदवलं.

जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे मविआचे समर्थक, पाठीराखे म्‍हणून एकत्र आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडीला कोणताही धोका नसल्‍याचा विश्‍‍वासही त्‍यांनी यावेळी केला. सातारा इथं विविध कार्यक्रमांसाठी अजित पवार (Ajit Pawar) आले होते.

या वेळी त्‍यांना अदानी समूहाच्‍या अनुषंगानं माजी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्‍यासह इतर विरोधी पक्षांनी संयुक्‍त संसदीय समितीच्‍या स्थापनेची मागणी केली असून, त्‍या भूमिकेला छेद देणारे मत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मांडल्‍याने महाविकास आघाडीत फूट पडू शकते या विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर अजित पवार यांनी वरील मत नोंदवलं.

पवार म्‍हणाले, प्रत्‍येकाची श्रद्धास्थानं असतात. त्‍यानुसार ते त्‍या त्‍या ठिकाणी जात असतात. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्‍येला गेले आहेत. आम्‍ही त्‍यांना दौऱ्यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. आम्‍ही सुद्धा अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी जातो. आमच्‍यातले अनेक तिरुपतीला जातात आणि त्‍याठिकाणाहून आणलेला प्रसाद दिल्‍यावरच ते आम्‍हाला सांगतात तिकडं गेलो होतो, असंही त्यांनी मिश्किलपणे सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT