Ajit Pawar Cancel pune visit after buldhana bus accident on samruddhi highway accident  
महाराष्ट्र बातम्या

Buldhana Bus Accident : बुलढाण्यातील भीषण बस अपघातानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय!

रोहित कणसे

नागपूरहून पुण्यात येत असताना एका खाजगी बसला झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचा भीषण प्रकार घडला आहे. या अपघातानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांनी अपघाताच्या घटनेमुळे पुण्यातील कार्यक्रमाला जाणं टाळलं आहे. तसेच अपघात स्थळी भेट देण्यासाठी अजित पवार जाण्याची शक्यता देखील आहे. त्यांना विमान उपलब्ध होत नसल्यामुळे जाण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवरा, उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्व बड्या नेत्यांनी बुलढाणा येथे झालेल्या या अपघतावर शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज, शनिवारी पुण्यातील सदाशीव पेठ येथे क्रांती अग्रणी अभ्यासिकेचे उद्घाटन होणार होते. राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इतकेच नाही तर आजित पवारांचे फ्लेक्स देखील सदाशीव पेठ परिसरात लावण्यात आले होते, तसेच मंडप देखील उभारण्यात आला होता.

सकाळी दहा वाजता होणाऱ्या उद्घाटनासाठी सगळे हजर झाले असताना अजित पवारांकडून साडेनऊ वाजता ते येणार नसल्याचा निरोप देण्यात आला. अजित पवारांचा शनिवारचा पुणे दौराच रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

नेमकं झालं काय?

नागपूरहून पुण्यात येत असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तसेच अपघातातील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे.

पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली. दरम्यान बसच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून वाहनचालकाची सुद्धा चौकशी करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपघातस्थळाला भेट देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT