Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबईत अधिवेशन होणार निर्णयावर अजित पवार यांचे स्पष्टीकरण

...म्हणून यंदाचे अधिवेशन मुंबईला घेण्याचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कुठे घ्यायचे या प्रश्नावर काल मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मुंबईत (Mumbai)घेण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. या भूमिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

अजित पवार म्हणाले, आर्थिक वर्ष संपल्यानंतर जेव्हा अधिवेशन सुरु होते त्यावेळी राज्यपालांचे अभिभाषण होते यासाठी एवढे मोठे सभागृह नागपूरात नाही. पुढे ते म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना याचा धोका आहे असे तज्ञांनी, टास्क फोर्सनी सांगितले होते. तिसऱ्या लाटेत मुंबईमध्ये कोरोनाची मोठी लाट आली. संख्या जेवढ्या वेगाने वाढली तेवढ्या वेगाने कमीही झाली. मात्र प्रत्येकाची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. यातून हा विचार करण्यात आला. आणि अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरवर्षी एक अधिवेशन नागपूरला घ्यावे असा करार आहे. पण कोरोनाचे संकट असल्यामुळे नायलाजस्तव हा निर्णय घ्यावा लागला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मागच्या अधिवेशनात १५ ते २० मंत्री पाॅझीटिव्ह झाले. यामुळे पाच दिवसात अधिवेशन संपविले. अजून अधिवेशन पुढे चालू ठेवले असते तर ही संख्या वाढली असती. मात्र त्या अधिवेशनात २४ बिले तसेच बहुतेक सर्व बिले चर्चा करून मंजूर केली. म्हणून यंदाचे अधिवेशन मुंबईला घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवारांनी सांगितले.आमदार निवासामध्ये कोरोना पाॅझीटिव्ह पेशन्ट आहेत. दरवर्षी एक अधिवेशन नागपूरला घ्यावे असा करार आहे. पण कोरोनाचे संकट असल्यामुळे नायलाजस्तव हा निर्णय घ्यावा लागला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT