Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: शंभर रुपयांमध्ये साखर, तेल देणार होते; गौडबंगाल काय?

संतोष कानडे

मुंबईः राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुण्याच्या रस्त्यांना तर नद्यांचं स्वरुप प्राप्त झालेलं आहे, शेतीत हातचं पीक वाया गेलंय. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. या सरकारचं राज्यातल्या जनतेकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.

आज सकाळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या राज्यात होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, पुण्यामध्ये अनेक ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांवर अजूनही पाणी आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होतेय.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आणखी जोरदार पावसाची शक्यता आहे. सरकारने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला पाहिजे. आवश्यक तिथे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अन्न पुरवण्याची सोय केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सध्या सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष असल्याचा आरोप पवारांनी केला.

सरकारने दिवाळीमध्ये स्वस्तात जिन्नस देण्याच्या केलेल्या घोषणेवर बोलतांना अजित पवार म्हणाले की, सरकारने शंभर रुपयांमध्ये दिवाळी गोड करणार असं सांगितलं होतं. शंभर रुपयांत तेल, रवा, डाळी देणार असं सांगितलं. त्याचं ५१३ कोटी रुपयांचं कंत्राटही दिलं पण अजूनही काही हालचाल दिसत नाहीये. या योजनेचं नेमकं काय झालं? नेमकं गौडबंगाल काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : आरक्षणवाढीचा कायदा घटनाबाह्य; SC-ST आरक्षणासंदर्भातील तरतुदी उच्च न्यायालयाकडून रद्द! काय आहे प्रकरण?

‘breaking bad’ फेम अभिनेता RJ Mitte अकाली निधन, अवघ्या ३४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Drought: दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांच्या मदतीवर ‘ट्रिगर’;

Prithvi Shaw - Akriti Agarwal Patch up: आधी मोडला साखरपुडा अन् लगेचच पॅचअप; नात्यात नेमकं काय घडलं? पोस्टमध्ये केला खुलासा

Thane Crime: ऑनलाइन अ‍ॅपवर ६२ वर्षीय महिलेनं मसाजसेवा बूक केली, घरात मसाजवेळी झोप लागताच...; ठाण्यात धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT