Ajit Pawar, Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: 'अजित पवार शरद पवारांनाच संभ्रमात ठेवतात', भाजपा नेत्याचं मोठं वक्तव्य

मविआमध्ये आता काही अर्थ उरलेला नाही असंही ते म्हणालेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर स्वतः अजित पवारांनी या चर्चांना पुर्णविराम देत आणि आपण राष्ट्रवादीतच असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. मात्र, त्या चर्चां अजूनही कुठे ना कुठे सुरू आहेत. अशातच आता राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी “अजित पवार शरद पवारांनाच संभ्रमात ठेवतात”, असं मोठं वक्तव्य केलं आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येत्या काळात मविआ एकत्र लढेल हे आत्ताच सांगता येणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मला अजित पवारांबाबतचा एक प्रश्न विचारण्यात आला होता. मी कालही त्याचं उत्तर दिलं आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणात लोकांना संभ्रमात ठेवणं ही त्यांची हातोटीच आहे. आता त्यांना अजित पवार संभ्रमात ठेवतात यापेक्षा कोणती मोठी गोष्ट असू शकते” असं ते यावेळी म्हणालेत.

महाविकास आघाडीबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, '“त्यांनी काय निर्णय घ्यायचा, त्यांच्या वक्तव्याचा काय अर्थ काढायचा हे मला माहिती नाही. म्हणून मी म्हटलं होतं की, महाविकासआघाडीच्या वज्रमुठीला तडे गेले आहेत. ग्रामीण भागात म्हणतो तसं हे उसणं अवसान आणण्याचा हा प्रकार आहे. मविआमध्ये आता काही अर्थ उरलेला नाही,” असं मत विखेंनी बोलताना व्यक्त केलं आहे.

“भविष्यात राष्ट्रवादी बरोबर आली तर भाजपा इच्छूक आहे का?” या प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “भविष्यात राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचं की नाही हा निर्णय पक्षपातळीवर पक्षाचे नेतेमंडळी घेतात. कुणाला बरोबर घ्यायचं कुणाला नाही हा निर्णय पक्षाने घ्यायचा असतो.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT