ajit pawar criticism on raj Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

भडकाऊ भाषणं करुन रोजीरोटीचे प्रश्न मिटणार आहेत का? अजित पवार

कोणाला तरी बरं वाटावं म्हणून भाषण करण्याने रोजीरोटीचे प्रश्न मिटणार का?

सकाळ डिजिटल टीम

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषणात अनेक मुद्दे उपस्थित करत महाविकास आघाडीवर टीका केली होती. यावरून आघाडीतील नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज निशाणा साधला आहे. भडकाऊ भाषणं करुन रोजीरोटीचे प्रश्न मिटणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारला आहे. शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस स्टेशन आणि नुतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

राज ठाकरे यांनी भाषणात बोलताना मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. या संदर्भात बोलताना नाव न घेता अजित पवार म्हणाले, काही लोक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाषण करतात. यामुळे तेढ निर्माण होऊ शकते. कोणाला तरी बरं वाटावं म्हणून भाषण करण्याने रोजीरोटीचे प्रश्न मिटणार का असा सवाल त्यांनी यावेळी केला.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील निशाणा साधला. ते म्हणाले, प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळाव्यात.राज्यात वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्ताने आंदोलनं केली जात आहेत. संघर्ष निर्माण केले जात आहेत. राजकारण म्हणून आंदोलन केली जात आहेत. पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी अशांतता निर्माण केली जाते. समाजात तेढ निर्माण केले जाते. सर्वत्र असं सुरु आहे. आता तरी हनुमान चालीसावरुन वाद सुरु आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळाव्यात असे खडेबोल राज ठाकरेंना सुनावले.

काय म्हणाले राज ठाकरे

"मशिदींवर एवढ्या मोठ्या आवाजात भोंगे का लावतात? मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. ज्या मशिदीबाहेर भोंगा दिसेल, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT