Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: स्वतःचा पक्ष..., अजित पवारांनी राज ठाकरेंना दिल्या खोचक शुभेच्छा

अतिप्रेम करणारेच संभ्रम निर्माण करतात

रुपेश नामदास

बारामती: ‘‘ज्यांना माझे काम बघवत नाही, मी जे करतो त्या बद्दल ज्यांच्या मनामध्ये चुकीचे काहीतरी असते, आमच्यावर अतिशय प्रेम करणारी जे लोक आहेत, तेच माझ्याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार करतात,’’ अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केली.

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘‘शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला मी हजर नव्हतो, कारण शरद पवार साहेबांनीच प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील व इतर काही मान्यवरांना पत्रकार परिषदेला यावे असे सांगितले होते.

पत्रकार परिषदेत खुर्च्याही मर्यादित असतात. त्या मुळे त्यांच्या सूचनेनुसारच आम्ही आमच्या कामाला गेलो होतो. त्या बाबतही विनाकारण बातम्या चालविल्या गेल्या. त्यांनी जो आदेश दिला होता त्या नुसारच ठराविक लोक पत्रकार परिषदेला हजर राहिले, बाकीचे हजर राहिले नाहीत.’’

मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचाराला गेल्याचे विचारले असता पवार म्हणाले, ‘‘ते कुठे गेले? काय करतात? याच्यावर मी लक्ष ठेवत नाही. मला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही, माझी कामे सुरु आहेत.’’ राज ठाकरे यांनी नक्कल केल्याबद्दल विचारता अजित पवार म्हणाले, ‘‘राज ठाकरे यांना ‘मिमिक्री’शिवाय दुसरं काय जमतं? ‘मिमिक्री’ करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे.

त्यांना जनतेने नाकारलेले आहे. स्वतःचा पक्ष वाढविण्याऐवजी अजित पवार यांची नक्कल करणे, त्यांचे व्यंग्यचित्र काढणे, यात त्यांना समाधान वाटत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT