Ajit Pawar Deputy Chief Minister Shivsena Bjp Ideology : राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांच्या त्या निर्णयानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे सरकार वेगवेगळ्या परिस्थितीतून जात आहे. अशावेळी राजकारणातील जाणकारांना, अभ्यासकांना आणि कार्यकर्त्यांना देखील अंदाज वर्तवणं अवघड होऊन बसलं आहे.
अजित पवारांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाचे काही आमदारांनी स्वागत केले आहे तर काही जणांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे.
Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?
पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार म्हणाले, आजपर्यत सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. वेगवेगळ्या पद्धतीनं पक्ष वाढण्यासाठी अनेक जणांची मदत केली आहे. यापुढील काळात तरुणांना संधी देणे गरजेचे आहे. तो प्रयत्न असणार आहे. भुजबळ साहेब आता बरोबर आहेत. आम्हाला काही टीका टिप्पणीचे वाटत नाही. महाराष्ट्र राज्य डोळ्यासमोर आहे. त्याचा विकास करायचा आहे. प्रत्येक आमदारांना आमचा निर्णय मान्य आहे. उद्याच्या काळात आम्ही पक्ष म्हणून समोर येणार आहोत. कुठल्याही निवडणूका असोत त्याच पक्षाच्या चिन्ह, नाव यातून निवडणूका लढवणार आहोत.
पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मंत्रीमंडळात सहभागी झालो आहोत. नागालँड मध्ये काय झालं होतं काही दिवसांपूर्वी हे आपल्याला माहिती आहे. आम्ही साडेतीन वर्षांपासून जो निर्णय घेतला त्यात आम्ही सगळ्यांनी मिळून काम केले आहे. आम्हाला जातीयवादी म्हणू नका. आम्ही राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना एकत्रित घेऊन काम करतो आहोत.
सगळेजण आमच्यासोबत आहेत. तुम्ही आमची काळजी करु नका. याशिवाय आम्ही जर वेगळ्या विचारांच्या शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर आम्ही भाजपसोबत देखील जाण्याचा विचार करु शकतो. अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.