Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : मुंबईला रवाना होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी...अजित पवारांचा खुलासा

आज विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे

सकाळ डिजिटल टीम

आज विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आठवडा भराने वाढवण्यात यावा या मागणीवर चर्चा होणार आहे. गेल्या दोन वर्षामध्ये कोरोना महामारीमुळे अधिवेशन होऊ शकलं नाही. हिवाळी अधिवेशन जर तीन आठवड्यांच झालं तर चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी फार मदत होईल. त्याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधक यांनाही आपली बाजू चांगल्या प्रकारे मांडता येईल असंही अजित पवार बोलताना म्हणाले आहेत.

तर अजित पवार आज दुपारी एक वाजता नागपूरहून मुंबईला रवाना होणार आहे. यासाठी शिंदे सरकारकडून विमान उपलब्ध करुन देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की उद्या सकाळी विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे. 'मी त्यांना म्हंटलं उद्या ऐवजी आपण परवा घेतली तर चालेल का? त्यावर शिंदे म्हणाले कारण काय आहे. ते म्हणाले मी दुपारी निघणार होतो. त्यामुळे त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले 10 वाजता सल्लागार समितीची बैठक लावतो आणि मी तुम्हाला शासनाच वाहन उपलब्ध करून देतो. तुम्ही त्यातून जावा आणि तुमचं काय काम असेल ते करून परत या' असं अजित पवार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून आम्ही जात आहोत. त्यामुळे आज दुपारी 1 वाजता मी शिंदे यांनी उपलब्ध करून दिलेल्या विमानाने मुंबईला जाऊन पुन्हा त्याच विमानाने परत येण्याची शक्यता आहे. अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामिनावर तुरुंगातून बाहेर येत आहेत. त्यांना भेटण्यासाठी अजित पवार जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fruit Crop Insurance : दिवाळीपूर्वी फळपीक विमा योजनेचा पहिला हप्ता मिळणार, कृषीमंत्र्यांचे सुतोवाच

Pat Cummins: ऑस्ट्रेलियाला धक्का! कर्णधार कमिन्सचं पुनरागमन लांबणार, प्रतिष्ठीत मालिकेला मुकणार; कारणही आले समोर

Latest Marathi News Live Update : बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गातून आरक्षण मागणीसाठी भव्य महामोर्चा

Diwali 2025 Picks: दिवाळीत खरेदी करा हे 10 शेअर्स; तुम्हाला मिळेल 25 टक्क्यापर्यंत परतावा, पाहा यादी

"मी कधीच कुणाला फसवणार नाही" धनश्रीच्या आरोपानंतर चहलने सोडलं मौन, म्हणाला...

SCROLL FOR NEXT