Uddhav Thackeray Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' विधानावरून अजित पवारांनी उघड केली नाराजी, म्हणाले...

रवींद्र देशमुख

मुंबईः मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होतं. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना एकनाथ शिंदे सरकारवर कडाडून टीका केली.

अजित पवार म्हणाले की, माध्यमांमध्ये माझ्याविषयी सातत्याने बातम्या येत आहे. मात्र तस काहीच नाही. शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालीच पक्षाची स्थापना झाली असून त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. मात्र ज्याकाही बातमी पसरवल्या जात आहेत त्या फक्त लक्ष भरकटवण्यासाठीच आहे. तसेच आमदारांच्या सह्या घेतल्या नसून जे आमदार मुंबईत आले आहेत, ते त्यांच्या कामासाठी आले आहेत.

नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या वज्रमुठ सभेत अजित पवार यांनी भाषण केलं नाही. यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी अजित पवार नाराज झाल्याचं म्हटलं होतं. यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, आमचं आधीच ठरलं होतं की, प्रत्येक पक्षाचे दोन नेते सभेत बोलतील. त्यापद्धतीने मराठवाड्यात मी बोललो होतो. नागपूरमध्ये आमचे दोन नेते बोलले. त्यात नाराज असण्याचं कारण नाही. सर्वांनीच भाषण केलं तर सभेतील लोक कंटाळतात. त्यामुळे मी केलं नाही.

दरम्यान अजित पवार यांनी इतर नेत्यांकडून देण्यात येत असलेल्या प्रतिक्रियांवर टीका केली. इतर पक्षांचे प्रवक्ते आमची भूमिका मांडत आहेत. पक्षाच्या मिटींगमध्ये मी विचारणार आहे. संजय राऊत यांचं नाव न घेता, ते म्हणाले की, तुम्ही तुमच्या पक्षाचं मुखपत्रात सांगा. आमचं वकीलपत्र घेऊ नका. उद्धव ठाकरेंना कोणी तरी विचारलं तर ते म्हणतात, मी एकटा लढेन. वास्तविक मी उद्धव यांना आधीच सांगितलं की, या चर्चांमध्ये तथ्य नाही, अस म्हणत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT