अजित पवार sakal
महाराष्ट्र बातम्या

...तर मत्स्य आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवेन : अजित पवार

जेट्टीचे काम सुरू झाले नाही याबद्दल विधानसभा आ. भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली.

सकाळ वृत्तसेवा

साखरीआगर येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत तब्बल १२ वर्षे रखडलेले काम २ कोटींवरून ८ कोटींवर पोहोचल्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी अडकवून ठेवल्याचे आ. भास्कर जाधव यांनी निदर्शनास आणल्यानंतर विरोधी आमदारांनी देखील अधिकाऱ्यांच्या मनमानीवर तीव्र संताप व्यक्त केला. अखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात संबंधितांची तातडीने बैठक घेऊन यावर जेटी होण्यासाठी मार्ग काढला जाईल असे सांगितले. या बैठकीला मत्स्य आयुक्तांना बोलावून माझ्या पद्धतीने त्यांना मी ‘शांतपणे’ समजावून सांगेन आणि नाहीच ऐकले तर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल, असे खणखणीत शब्दांत सुनावले.

जेट्टीचे काम सुरू झाले नाही याबद्दल विधानसभा आ. भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली. लक्षवेधीच्या चर्चेत विधानसभा सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी भाग घेतला. यावेळी भास्कर जाधव यांनी २०११ पासून जेटीच्या रखडलेल्या कामाची पाढा वाचला. केवळ २ कोटी ९६ लाखाचे काम ८ कोटी ४३ लाखावर पोहोचल्याचे सांगितले. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीतही या कामासाठी पैसे वितरित करण्याचे आदेश मत्स्य आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती दिली. मात्र अतुल पाटणे या अधिकाऱ्यांनी अजित पवारांनी सांगितले तरी पैसे देणार नसल्याचे बैठकीनंतर सांगितल्याची माहिती भास्कर जाधव यांनी सभागृहाला दिली.

पुन्हा बैठक बोलाविणार

या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत अजित पवार यांनी लवकरच पुन्हा बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला पालकमंत्री मत्स्यविकास मंत्री अस्लम शेख, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, आ. भास्कर जाधव आणि मत्स्यविकास आयुक्तांना बोलावले जाईल असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT