Ajit Pawar
Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र

Ajit Pawar: अजित पवारांना निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा; त्या वक्तव्याप्रकरणी दिली क्लिन चीट

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आचार संहिता भंग प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट मिळाली आहे. अजित पवारांनी बोलताना निधावाटपाबाबत एक वक्तव्य केलं होतं त्यावरून निवडणूक आचार संहिता भंग प्रकरणात त्यांना क्लीनचिट मिळाली आहे. याबाबत शरद पवार गटाने तक्रार दाखल केली होती.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावर क्लीन चिट दिली आहे. RO ने काल राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालात अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग झाला नसल्याचे नमूद केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ वारंवार पाहिला. यामध्ये मला आढळून आले आहे की आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन झाले नाही,” असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी या पत्रकात सांगितले आहे.

द्विवेदी म्हणाल्या की, अजित पवार यांनी कोणत्या पक्षाचे किंवा उमेदवाराला मते द्यायची हे सांगितले नाही. व्हिडिओमध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार मतदारांना ईव्हीएमसाठी मतदान करण्यास सांगत असल्याचे ऐकले आहे… विशिष्ट उमेदवार किंवा पक्षाला मत द्या, असे ते म्हणालेले नाहीत. आणि त्यामुळे हे कोणत्याही आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही,” असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

द्विवेदी म्हणाल्या की त्यांनी हा अहवाल जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे पाठवला आहे, जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत आणि त्याची प्रत राज्य निवडणूक आयोगाला देखील पाठवली आहे. यासंबधीचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने (indian express) दिले आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

काय लागेल को निधी द्यायला सहकार्य करू, पाहिजे तेवढा निधी देतो, पण मशीनमध्ये बटण दाबा कचाकचा, म्हणजे मलाही बरे वाटेल. नाही तर माझा हात आखडता होईल, असं वक्तव्य अजित पवार यांनी इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या परिषदेत बोलताना केलं होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करत गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर विरोधकांनी देखील याबाबत तक्रार दिली होती, त्यानंतर राज्या निवडणूक आयोगाने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अजित पवारांच्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT