ajit pawar
ajit pawar esakal
महाराष्ट्र

"ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धमक्या आल्या..." अजित पवार संतापले, सरकारला धरलं धारेवर

रुपेश नामदास

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सतत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले, तर अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी देखील सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

आज देखील सभागृहात प्रश्नांची उत्तरे द्यायला मंत्री उपस्थित नसल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले. मागील मागील आठवड्यात सुध्दा सभागृहात मंत्री नसल्याने अजित पवार तसेच विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचे पाहिला मिळाले होते.

दरम्यान अजित पवारांनी आज ट्विट करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी ट्विट करत राज्यातील महत्त्वांच्या विषयांना हात घातला आहे. मागील काळात एका फोन कॉल वरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धमक्या आल्या होत्या सोबतच अंबानी हॉस्पिटलला आणि मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आली होती. या प्रकरणावरून देखील सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

कोकणातल्या रिफायनरीच्या विरोधात लिखाण करणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांची भरदिवसा हत्या करण्यात आलेली हत्या, दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांना आपल्याकडे खेचण्यासाठी लगेच ‘ए.सी.बी.’ची नोटीस दिली.

विरोधकांवर हल्ले होताना त्यांच्या सुरक्षेकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केलं जात आहे.काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी,महिला आमदार डॉ.प्रज्ञाताई सातव यांच्यावर भ्याड हल्ला झाला. अशा विविध प्रश्नांवर त्यांनी मत व्यक्त केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT