ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

'बायकोला खांद्यावर घेऊन नाचू शकतो, पण योगा नाही होणार', नरहरी झिरवळांबद्दल अजित पवार म्हणाले...

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमात अजित पवार यांनी सरकारला जोरदार फटकारलं. शिवाय त्यांनी योग दिनाबद्दलचा एक किस्सा सांगून सभागृहात हशा पिकवला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासह पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, आपली सत्ता असतांना शेतकऱ्यांना भारनियमनमुक्त केलं होतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांना कारण नसतांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे. आपल्या नेत्यांची विनाकारण बदनामी केली जाते हे खपवून घेतलं जाणार नाही.

पवार पुढे म्हणाले की, आज जागतिक योग दिनानिमित्त विधिमंडळासमोर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कोट्यवधींची उधळण यासाठी केली गेली. तुम्हांला गरज असो की नसो, जाहिरातीच्या माध्यमातून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना बघावं लागतं

नरहरी झिरवळांबद्दल अजित पवार म्हणाले...

अजित पवार म्हणाले, योग दिनासाठी मलाही बोलावलं होतं. अंबादास दानवेंना बोलावलं होतं आणि झिरवळ यांनाही बोलावलं होतं. मी झिरवळ यांना का गेला नाहीत, असं विचारलं तर ते म्हणाले, पोट एवढं वाढलं की योगा होतच नाही. योगा नाही झाला की आजूबाजूचे लोक वाढलेलं पोट बघतात. योगा होत नाही पण बायकोला खांद्यावर घेऊन नाचू शकतो म्हणाले.

अजित पवारांनी हा किस्सा सांगताच सभागृहात हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT