महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : भूमिपूजनाच्या फलकावरुन अजित पवार गट अन् भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगरः नगरच्या कोपरगाव मतदारसंघामध्ये सत्तापक्षातले दोन गट आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळाचं वातावरण निर्माण केलं होतं.

भूमिपूजनाच्या फलकावरुन कोपरगावमध्ये आज राडा झाला अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे आणि भाजप युवा नेते विवेक कोल्हे आमने-सामने आले होते. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती.

उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. आशुतोष काळे समर्थक आणि विवेक कोल्हे समर्थक एकमेकांसमोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

राज्याच्या राजकारणामध्ये सध्या विचित्र परिस्थिती आहे. सत्तापक्षामध्ये भाजप, राष्ट्रवादीचा एक गट आणि शिवसेनेचा एक गट सहभागी आहे. सत्तेत इतर पक्ष सहभागी झाल्याने मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कुरबूर सुरु आहे. अनेक मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीत गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार, हे मात्र नक्की.

कोपरगावमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये कुरबूर सुरु झालेली आहे. आजच्या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला असून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आरडाओरड करत घोषणाबाजी करत असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT