Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: “दिल्लीच्या तख्तापुढे…”, अजित पवारांचे महायुतीत १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर शरद पवार गटाकडून हल्लाबोल

शरद पवार गटाकडून अजित पवारांवर हल्लाबोल

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात गेल्या काही माहिन्यांपुर्वी मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी भाजप-शिवसेना सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली. काल (मंगळवारी) अजित पवारांना सत्तेत सहभागी होऊन १०० दिवस पुर्ण झाले. त्यानंतर अनेकदा अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहिलं आहे.

या पत्रामध्ये अजित पवारांनी शरद पवारांचा उल्लेख न करता यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला आहे. आता शरद पवार गटाने अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत X खात्यावरून अजित पवारांवर टीका केली आहे.

काय म्हटलं आहे शरद पवार गटाने?

'१०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण', असं म्हणत राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींचा लोखाजोखा मांडण्यात आला आहे. “१०० दिवस छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे, १०० दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणण्याचे, १०० दिवस वारकऱ्यांवर, मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या नतद्रष्ट्यांसोबतचे, १०० दिवस रुग्णालयांतील मृत्यूकांडास जबाबदार असंवेदनशील सरकारसोबतचे, १०० दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार, प्रकल्प हिरावून घेणाऱ्या महाराष्ट्र विरोधकांसोबतचे, १००दिवस माताभगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तीसोबत राज्यकारभार करण्याचे, १०० दिवस मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत, समाजाचे आरक्षण रखडवणाऱ्या आरक्षणाविरोधकांसोबतचे, १०० दिवस मराठी अस्मितेची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांसोबतचे”, असा हल्लाबोल राष्ट्रवादी पक्षा(शरद पवार) कडून करण्यात आली आहे.

“१०० दिवसांचं कर्तुत्व सांगावं लागणं यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येत आहे”, अशी टीका त्यांनी केली आहे.

“पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही. जो तुम्ही गेले १०० दिवस गहाण ठेवलात. कितीही मोठं संकट आलं तरी विचारांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून कुणापुढे न झुकता महाराष्ट्राच्या हिताचा ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमध्येच आहे”, असंही शरद पवार गटाने म्हटलं आहे.

दरम्यान अजित पवार गटाला सत्तेत जाऊन १०० दिवस पुर्ण झाले. यानिमित्तत्यांनी एक पत्र लिहलं आहे. अजित पवार यांनी पत्रामध्ये आपल्या निर्णयाच्या १०० दिवसांच्या पूर्तीचा उल्लेख केलेला आहे. “आज १० ऑक्टोबर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मी पत्राद्वारे आपल्याशी संवाद साधत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात याआधीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली. असे निर्णय त्या त्या वेळच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीनुसार नेत्यांना घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील झाला”, असं पत्रात लिहलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT