NCP Political Crisis Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : अजित पवार गटाची मोठी खेळी; अपात्र करण्याच्या याचिकेतून वगळली 'या' तीन बड्या नेत्यांची नावं, कारण...

याचिका दाखल करताना अजित पवार गटाची नवी खेळी समोर आली आहे.

रोहित कणसे

नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. पक्ष आमचाच हे सिद्ध करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यादरम्यान शरद पवार गटानंतर आता अजित पवार गटाची लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करा या मागणीसाठी याचिका दाखल केला आहे.

ही याचिका दाखल करताना अजित पवार गटाची नवी खेळी केल्याचे समोर आले आहे. अजित पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नावे मात्र या याचिकेतून वगळली आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर कारवाई केल्यास या दोन्हीं नेत्यांना सहानभुती मिळू शकते त्यामुळं या दोघांची नावे वगळल्याची सूत्रांची माहिती आहे.

तर अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिल्यानं त्याचं नाव वगळले असून अजित पवार गटाकडून आपल्याकडे लोकसभेत 2 सदस्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यसभेतील शरद पवार वगळता वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. तर लोकसभेत श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे.

दरम्यान कालच शरद पवार गटाच्या खासदारांनी राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची भेट घेत खासदार प्रफुल पटेल यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT