महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित पवार गट पाच राज्यांमध्ये निवडणुका लढणार?, पक्षचिन्ह घड्याळ की...

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? अजित पवारांचा की शरद पवारांचा? हा वाद आता निवडणूक आयोगात आहे. शिवाय दोन्ही गटांकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत.

सोमवारी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम. या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनी ताकद लावण्यास सुरुवात केलीय.

त्यातच आता अजित पवार गट पाच राज्यांमध्ये निवडणुका लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. निवडणूक आयोगाचा निर्णय झाल्यास अजित पवार गट पाच राज्यातील काही मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं कळतंय. यासंदर्भात अधिकृत माहिती कळू शकलेली नाही. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, शुक्रवारी शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली असून आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा, यासाठी ही याचिका दाखल केलीय. दुसरीकडे अजित पवार गटानेही एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलीय.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाआगोदर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली तर पक्षचिन्हाबाबत कोर्टाने निर्णय देण्याआधी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, यासाठी अजित पवार गटाने कॅवेट दाखल केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT