Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: आगामी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत महिला निवडून येतील; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

महिला पदाधिकारी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. आगामी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत महिला निवडून येतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Sandip Kapde

Ajit Pawar News In Marathi

अजित पवार गटाचा महिला पदाधिकारी मेळावा आज मुंबईत पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. आगामी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत महिला निवडून येतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

अजित पवार म्हणाले, १० जूनला पक्षाची स्थापना झाली तो दिवस आठवतोय. वेगवेगळ्या वेशभूषा करुन महिल्या आल्या आहे. अधिवेशनासाठी नागपूरमध्ये असताना गडचिरोलीला दौऱ्यावर गेलो होतो. तेथे नक्षली घटना घडतात. त्या ठिकाणी मुली मोठा वोल्हो चालवताना दिसल्या. एसटी महामंडळात काही महिला चालकसुद्धा आहेत. विमान प्रवासात देखील पायलट या महिला असतात. काम चोख करण्याची महिलांची रीत आहे. मंचावर काही कागद पडली होती. रुपालीताई उठल्या पण एकही गडी ते कागद उचलायला उठला नाही. (Latest Marathi News)

महिला जे काम करतात ते चोखपणे करतात. कुठलही काम असू द्या महिला पुढं येतात. आम्ही जेव्हा महिलांच बील पास केलं. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत सभागृहात थांबलो होतो. रात्री तीन वाजता बील पास झालं. महिला सशक्तीकरणासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. महिला धोरणात काही गोष्टी होत्या त्यावर अदिती तटकरे यांनी अभ्यास केला आहे. ६ लाख कोटींच बजेट एवढ राज्याच बजेट मी सादर करतो. महिलांच्या सुरक्षेसाठी काही कायदे केलेत… दुदैवाने ते केंद्रात अडकले आहेत. राष्ट्रपतींकडे अडकले आहेत.अदिती आपण एकदा दिल्लीत जाऊन राष्ट्रपतींच्या भेट घेऊन तो विषय पुढे नेऊ, असे अजित पवार म्हणाले.

आगामी निवडणुकांवर देखील अजित पवार यांनी भाष्य केले. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. फेब्रुवारी झाला की आचारसंहिता लागेल. राज्यात महायुतीचे मेळावे होतील. त्या मेळाव्याला देखील महिलांनी हजेरी लावावी, असे आवाहन अजित पवारांनी केले.

महाराष्ट्राच्या हिताचे प्रकल्प राज्यात आली पाहिजेत. न्हावा शेवा सारखी विकासाची काम आपण केली पाहिजेत. दुधाचा व्यवसाय टिकला पाहिजे म्हणून संबंधित महिला - पुरुषांच्या खात्यात पैसे देतो. कांद्याच्या प्रश्न आहे… तो विषय आम्ही पंतप्रधानांच्या कानांवर घातला आहे. शब्दांचा पक्का म्हणून माझी ओळख आहे. कोणाला खेळवत ठेवण मला मला जमत नाही. राज्याच वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. मात्र समाजात सामाजिक सलोखा राखला पाहीजे. सुस्कृंत महाराष्ट्र अशी आपली ओळख आहे, असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT