ncp hearing esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : ''घर चालवल्याप्रमाणे शरद पवार पक्ष चालवत होते'', अजित पवार गटाकडून युक्तिवाद

संतोष कानडे

नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत संघर्षावर सुनावणी सुरु आहे. शुक्रवारच्या सुनावणीनंतर सोमवारी दुसऱ्यांदा सुनावणी होत आहे. सुरुवातीलाच शरद पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर अजित पवार गटाने आपलं म्हणणं माडलं.

आयोगात सुरु असलेल्या सुनावणीमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे थेट शरद पवारांना उद्देशून आक्षेप घेतले गेले. शरद पवारांनी पक्ष घरासारखा चालवला, पक्षामध्ये नियमांचं पालन केलं जात नव्हतं, असं अजित पवार गटाच्या वकिलांनी नमूद केलं.

विशेष म्हणजे शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच आक्षेप घेण्यात आला. स्वतः निवडून न येणारे इतरांच्या नेमणुका कशा करु शकतात? असा मुद्दा उपस्थित केला केला. शरद पवारांच्या कथित एकाधिकारशाहीचा मुद्दा अजित पवार गटाकडून पुन्हा अधोरेखित करण्यात आला.

अजित पवार गटाकडून अॅड. निरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे युक्तिवाद करत आहेत. तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करीत आहेत. अजित पवार गटाने १ लाख शपथपत्र असल्याचा दावा केलाय तर शरद पवार गटाने ४० हजार शपथपत्र असल्याचा दावा केला आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT