Ajit Pawar in EC: 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar in EC: शरद पवारांची २०२२ मधील नेमणूक ग्राह्य धरता येणार नाही, अजितदादा गटाचा धक्कादायक दावा

Sandip Kapde

Sharad Pawar : अजित पवार यांच्या गटाकडून मोठा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगात गेली आहे. अजित पवार यांनी शपथविधीच्या दोन दिवस आधी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. या याचिकेत अजित पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान आणखी एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून २०२२ मध्ये झालेली नेमणूक ग्राह्य धरता येणार नाही. कारण तेव्हा झालेल्या राष्ट्रीय बैठकीचे पुरावे अस्तित्वात नाहीत. बैठकीत कोण उपस्थित होते याची काही माहिती उपलब्ध नाही, असा दावा अजित पवार गटाने केला आहे.

खळबळजनक बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या दोन दिवस आधीच ही याचिका अजितदादांच्यावतीनं निवडणूक आयोगाकडं दाखल करण्यात आली होती. तसेच या याचिकेसोबत दिलेल्या पत्रात ४० आमदारांच्या सह्या असल्याचं समोर आलं आहे. तसेच अजितदादांच्या ठरावात अजित पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, असा उल्लेखही या याचिकेत करण्यात आला आहे.

दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या दोन भिन्न ठिकाणी बैठका पार पडल्या. यामध्ये एमईटी इन्स्टिट्यूटमध्ये अजितदादांच्या गटाची बैठक झाली तर वायबी सेंटरमध्ये शरद पवारांनी बैठक बोलावली होती. यामध्ये दोन्ही बाजुंकडून आपली बाजू मांडताना दोन्ही नेत्यांवर कडाडून टीका करण्यात आली.

अजितदादांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत आपल्या समर्थकांसह रविवारी सत्तेत सामिल झाले तसेच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर इतर आठ जणांनी देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT