Monsoon Assembly Session Esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Assembly Session: विरोधी पक्ष नेते पदाच्या दालनात अजित पवार! विरोधी पक्ष नेत्याला ऑफिस नाहीच?

विधान सभा विरोधी पक्ष नेत्याला सध्या दालन नाही

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत आल्याने सत्ताधारी वरचढ ठरणार, की विरोधक वरचढ ठरणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक गोष्टींवरून कोंडीत पकडू शकतात. राज्यात पुरेसा पाऊस न झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी, महागाई यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

तर राष्ट्रवादीतील फूटीमूळे आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये राष्ट्रवादी असणार आहे. अशातच राष्ट्रवादीतील दोन गटामुळे दालनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेत्याला सध्या दालन नाहीये. विधान भवनातील विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी तेच केबिन सध्या कायम ठेवले आहे. विरोधी पक्ष नेते पदाचे दालन हेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालन झाले आहे. त्यामुळे विरोध पक्ष नेत्यासाठी दालन कोणते हा प्रश्न निर्माण झाला आहे.(Latest Marathi News)

विधानसभा विरोधी पक्ष नेत्याला सध्या दालनाप्रमाणेच विधिमंडळातील राष्ट्रवादी कार्यालयात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गट याना वेगळेवेगळे कार्यालय देण्यात आले नाहीत. पक्ष कार्यालय पहिलेच असून त्यात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर दरवाजावर विधानसभा प्रतोद अनिल पाटिल यांच्या नावाची पाटी आहे. (Marathi Tajya Batmya)

राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर काही आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. अशातच विधिमंडळातील राष्ट्रवादी कार्यालयात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांना वेगळेवेगळे कार्यालय देण्यात आले नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूचे नेते एकत्रित बसणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT