Jitendra Awhad  sakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad : अजित पवार महाराष्ट्राचे बहुरूपी ; जितेंद्र आव्हाड यांची वेषांतरावरून टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक मोठा बहुरूपी कलाकार मिळाला, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक मोठा बहुरूपी कलाकार मिळाला, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वेषांतर करून घेतलेल्या भेटीगाठीबाबत पवार यांनी वक्तव्य केले होते. त्याचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी संभाजीराजे छत्रपती हे राजर्षी शाहू महाराजांच्या रक्ताचे वारस असले, तर मी त्यांच्या विचारांचा वारसदार असल्याचे सांगत विशाळगड प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला.

आव्हाड म्हणाले, ‘‘अजित पवार यांनी कधी टोपी घालून, गॉगल घालून तर कधी रेनकोट घालून भेटीगाठी केल्या. महाराष्ट्राला असा बहुरूपी मिळाला, त्यापेक्षा महाराष्ट्राला भूषवणारा चांगला उपमुख्यमंत्री मिळायला हवा.’’

एका संभाजीने ठरविले, दुसऱ्याने केले

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर अतिक्रमणाबाबत घडलेली घटना ही खासदार छत्रपती शाहू महाराज यांनादेखील पटलेली नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिका घेतली. संभाजी भिडेने जे ठरवले ते दुसऱ्या संभाजीने केले, असा एकेरी उल्लेख करत आव्हाड यांनी आपण कुठल्याही धमक्यांना घाबरत नसल्याचे सांगितले.

आव्हाड यांची गाडी ‘स्वराज’ने फोडली

विशाळगड प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका करणाऱ्या आ. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत तोडफोड केली. आव्हाड मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जात असताना हा हल्ला करण्यात आला. स्वराज्य संघटनेने हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली. आ. आव्हाड यांनी विशाळगड प्रकरणावरून संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. ‘‘संभाजीराजेंना छत्रपती म्हणणे सोडून द्या. कारण त्यांना जो अधिकार, वंशपरंपरा होती, ज्या वंशाचे रक्त ते पुढे घेऊन जात होते, त्या रक्तात काय होतं आणि यांच्याकडे काय, हे तपासण्याची आवश्यकता आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्यातील माणूस दंगल होऊ शकणारे वक्तव्य करतो. तो शाहू महाराजांचा वारसदार होऊच शकत नाही,’’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT