Ajit Pawar left for Nashik by Vande Bharat Express for shasan aplya dari Video CM Shinde Devendra Fadnavis  
महाराष्ट्र बातम्या

Video : अजित पवारांनी घेतला 'वंदे भारत'चा फील; नाशिकमध्ये करणार शक्तिप्रदर्शन

रोहित कणसे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी 'वंदे भारत एक्सप्रेस'ने नाशिकला रवाना झाले. या प्रवासादरम्यान ठाणे रेल्वे स्थानकावर अजित पवारांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.

नाशिक येथे अजित पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिक रोड ते शासकिय विश्रामग्रहापर्यंत कार्यकर्त्यांकडून बाइक रॅली सुद्धा काढण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नाशिक येथे होणार आहे.

दरम्यान या कार्यक्रमासाठी भव्य तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणाक शक्तिप्रदर्शन देखील केले जाणार आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर अजित पवारांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे.

राज्यभरातील लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना योग्यरित्या पोहचाव्यात यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यभरात १० ठिकाणी असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यानंतर नाशिकमध्ये होणारा हा ११ वा कार्यक्रम असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT