Ajit Pawar Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

चांद्यापासून बांद्यापर्यंत, आमचा अर्थसंकल्प सर्व घटकांसाठी - अजित पवार

"आमचं सरकार आलं आणि जगावर कोरोना आला"

सुधीर काकडे

Maharashtra Budget Session : विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर केला. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना काळानंतरचा हा अर्थसंकल्प असल्यानं यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आमचं सरकार आलं आणि जगावर कोरोना आला, त्यामुळे जगाच्या, देशाच्या आणि राज्याच्या अशा सर्व अर्थव्यवस्थांवर ताण निर्माण झाला. केंद्राने जीडीपीच्या (GDP) साडेतीन टक्क्यांपर्यंत कर्ज उचलण्याची मुभा दिली होती. आम्ही तीन टक्क्यांपर्यंत कर्ज घेतलं. विकास कामांना निधी कमी न पडू देता, आम्ही हा अर्थसंकल्प तयार केला. चांद्यापासून ते बांद्यापर्यंतच्या सर्व घटकांच्या कामाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

राज्याच्या सर्वांगीण हिताचा हा अर्थसंकल्प आहे. नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २० लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी म्हणून ५० हजार रुपये असे दहा हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करणार आहोत. शेततळ्यासाठी ५० हजारांची मर्यादा ७५ हजार केली. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळण्यासाठी देखील प्रयत्न केला आहे असं अजित पवार म्हणाले.

सभागृहातून बाहेर येताच फडणवीसांची टीका

राज्य सरकारकडून आज सादर करण्यात आलेल्या योजना म्हणजे भाजपने यापूर्वी केलेल्या घोषणांचाच पाढा यंदाच्या अर्थसंकल्पात वाचला गेला आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गरीब, बारा बलुतेदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे. आताचा जो अर्थसंकल्प मांडला तो कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. बजेटवरून चार बातम्या तयार होऊ शकतात. यापलिकडे काहीच नाही असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT