महाराष्ट्र बातम्या

दिलखुलास अजितदादा! पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचं हट्ट!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी... करड्या शिस्तीसाठी... वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी प्रसिद्ध आहेत. अजितदादांकडे सध्या अर्थसंकल्प तयारीच्या बैठका सुरू आहेत. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अजितदादांनी त्यांच्या कार्यालयातील चोपदारांच्या मुलगी आणि जावयाची उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा पूर्ण केली. चोपदार विलास मोरे यांची मुलगी आणि जावयाला फक्त भेट दिली नाही, तर दिलखुलास संवाद साधला. संवाद साधताना अजितदादांनी (Ajit Pawar) त्यांना अनेक प्रश्न विचारले.

मुंबईत कुठे राहता? कुठल्या शाळेत शिकलात? अमेरिकेत कधी गेलात? अमेरिकेत कुठे राहत होता? तिथं कामाची वेळ, स्वरूप कसं असतं? तिथं छोट्या बाळाला कोण सांभाळतं? असे प्रश्न विचारले. लग्न कसं जमलं, लव्ह की अरेंज मॅरेज? हा प्रश्नही दादांनी विचारला. दोघांच्या घरच्यांचीही दादांनी आपुलकीनं चौकशी केली. अजितदादांच्या जिव्हाळ्याच्या वागण्यानं निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे कृतार्थ झाले, तर त्यांची लेक आणि जावई अक्षरश: भारावून गेले होते.

उपमुख्यमंत्री कार्यालयात विलास मोरे हे चोपदार पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सेवाकाळत सचोटीनं सेवा केली. येत्या काही दिवसात ते सेवानिवृत्त होत आहेत. चोपदार विलास मोरे यांची मुलगी स्नेहा हिचं चार वर्षापूर्वी गणेश साळुंखे यांच्याशी लग्न झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याची त्यांची अनेक दिवसांपासून इच्छा होती. ही इच्छा ते वारंवार मोरे यांच्याकडं व्यक्त करत होते.

लेकीचा आणि जावयाची इच्छा अजितदादांना सांगण्याची चोपदार विलास मोरे यांची हिंमत होत नव्हती. चोपदारांनी परवा हिंमत करुन त्यांच्या मुलीला आणि जावयाला आपल्याला भेटायचं आहे, असं अजितदादांना सांगितलं. त्यावर अजितदादांनी तात्काळ होकार दिला. वेळापत्रक व्यस्त असूनही दुसऱ्या दिवशीच भेटायला बोलवलं. दादांची परवानगी आणि वेळ मिळाल्यानंतर चोपदारांची मुलगी स्नेहा आणि जावई गणेश यांनी काल अजितदादांची भेट घेतली. अजितदादांनी सुध्दा आपुलकी, जिव्हाळ्यानं त्यांच्याशी संवाद साधला. वैयक्तिक, कौटुंबिक चौकशी केली. मुलगी व जावयाच्या कर्तबगारीबद्दल अजितदादांनी चोपदार विलास मोरे यांचंही कौतुक केलं. अजितदादांनी केलेलं कौतुक तसंच लेकीचा, जावयाचा हट्ट अजितदादांनी पुरवल्यामुळं सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते, तर त्यांची लेक आणि जावई अजितदादांच्या आपुलकीमुळं अक्षरश: भारावून गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahuri Bypoll: प्राजक्त तनपुरे यांची माघार; रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई, अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा?

नवी मुंबईत गोळीबाराचा थरार! इसम बाईकवरून आला, समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या अन्...; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Ayodhya: अयोध्येत सापडला ३०० वर्ष जुना खजिना! हाताने लिहिलेली 'रामचरितमानस'ची दुर्मिळ प्रत समोर; सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Weather: यंदाचा उन्हाळा ठरणार ‘विरोधाभासी’! उन्हाच्या कडक चटक्यांसह सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, आरोग्याबरोबरच शेती क्षेत्रावरही संकट..

विराट कोहलीला धुरंधर चित्रपट पाहून काय वाटलं? स्पेशल पोस्ट करत म्हणाला, 'मी भारतात कधीच याआधी...'

SCROLL FOR NEXT