ajit pawar 
महाराष्ट्र बातम्या

उपमुख्यमंत्र्यांमुळे मंत्र्यांची धावपळ

प्रशांत बारसिंग

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाक्‍यात कामाला सुरुवात केली असून, त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची धावपळ उडाली. त्यांच्या या कामाचा दणका शिवसेनेच्या मंत्र्यांनाही बसला आहे. नियोजन समितीच्या बैठकीचा अहवाल वेळेतच देण्याबाबत उपमुख्यमंत्री दक्ष असल्याने पालकमंत्री सुभाष देसाई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी औरंगाबादला तातडीने रवाना झाले.अजित पवार यांच्या कामाची पद्धत सर्वश्रुत आहे.

अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर गेल्या आठवडण्यात ते सकाळीच पुण्यात दाखल झाले. अर्थमंत्री म्हणूनदेखील त्यांनी विभागाच्या आढावा बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. वित्त मंत्री या नात्याने त्यांनी मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी असलेल्या जिल्ह्यांची नियोजन समितीच्या बैठका घेऊन त्याचा अहवाल सोमवारी उशिरापर्यंत पाठविण्याचे आदेश दिले आहे.

सुभाष देसाई औरंगाबादचे पालकमंत्री आहेत. तेथे  प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करणार आहेत. त्यापूर्वी २५ जानेवारी रोजी औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीचा बैठक घेऊन अहवाल देतो, असा निरोप देसाई यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला. ही बाब अजित पवार यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी अर्थसंकल्पात औरंगाबादसाठी निधी मिळाला नाही, तर चालेल का, असा सवाल करून हा निरोप देसाई यांना देण्याचे आदेश कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले. या निरोपामुळे देसाई औरंगाबादला रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

एकनाथ शिंदेंना सवलत
अजित पवार यांनी नियोजन समितीच्या अहवाल कामासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना काही अंशी सवलत दिली आहे. शिंदे ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे गडचिरोलीचा अहवाल २१ जानेवारीच्या सायंकाळपर्यंत दिला तरी चालेल, अशी सवलत शिंदे यांना मिळाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठाणे नियोजन समितीची बैठक संपवली असून उद्या ते गडचिरोलीला रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT