Ajit Pawar News ncp  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar News NCP : 'ती' बैठक ठरली अजित पवारांच्या बंडाचे कारण, मोठी माहिती समोर

Sandip Kapde

Maharashtra Politics :   महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ३० ते ४० आमदारांसह राजभवनात पोहोचले आहेत. हे सर्व आमदार त्यांचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे समीकरण वेगाणे बदलत आहे. अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते राजभवनात पोहोचले आहेत.

अजित पवार यांनी बंडाचे हत्यार का उपसले याचे अनेक कयास लावले जात आहेत. दरम्यान पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने महत्त्वाचे कारण दिले आहे. (Ajit Pawar News ncp )

सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी पाटण्यात जाऊन विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहून काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत स्टेज शेअर केल्याने अजित पवारांचे समर्थक नाराज झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असे, पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. समर्थक आमदारांना मंत्री केले जाऊ शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनात पोहोचले आहेत. काही काळ राष्ट्रवादीत सर्व काही ठीक चालले नव्हते. शरद पवार यांनी तर मंचावरून राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, अचानक झालेल्या मोठ्या उलथापालथीचे कोणालाच भान नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT