Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics News : एक मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री आज एकाच जाहीर कार्यक्रमात; गडचिरोली येथे सभा

Ajit Pawar Latest Update : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पहिल्यांचा एकत्र जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत.

संतोष कानडे

Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पहिल्यांचा एकत्र जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. हे तीन नेते काय बोलणार याकडे सबंध राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

आज ११ वजता गडचिरोली येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. शासन आपल्या दारी या योजनेंतर्गत शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना योजनांचे लाभ आणि दाखल्यांचं वितरण करण्यात येणार आहे. मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र प्रवास करणार आहेत.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यानंतर दोन्ही गटांकडून आमचाच खरा पक्ष, असं सांगितलं जात आहे. पक्षामध्ये सध्या तू-तू, मैं-मैं सुरु झालेलं आहे. त्यातच शरद पवार आज येवल्यात जाहीर सभा घेणार आहेत. काल रात्री रोहित पवार यांनी कार्यक्रमस्थळाची पाहाणी केली.

दरम्यान, आजच्या गडचिरोलीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार काय बोलणार; याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कोटगुल एमआयडीसीच्या मैदानावर ही सभा होत आहे. नवीन सत्ता समीकरणानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते एकत्र व्यासपीठावर येणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झालेला असला तरी सध्या खातेवाटप झालेलं नाही. अधिवेशनाच्या अगोदर खातेवाटप होईल, असं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जीवदान मिळालं, तरी गणित फसलं! विक्रमांचा पाऊस पाडणारा Virat Kohli कसा बाद झाला पाहा... Video Viral

Woman Mountaineer : पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी ‘माऊंट मेंटोक कांग्री-२’ शिखरावर फडकवला तिरंगा

Latest Marathi News Live Update : केतन अन् सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT